Relative Name not Found in Aadhar Data.Please use alternate
method of Authentication. How To Solve This Error |
असा error तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसेन्स काढताना येत असेल तर
हे करा.
Relative Name not Found in Aadhar Data.Please use alternate method of Authentication.
How To Solve This Error .
असा error तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसेन्स काढताना येत असेल तर हे करा.
त्यासाठी तुम्हाला एक तर अधिकृत आधार सेंटर ला जावे लागेल आणि आपले आधार दुरुस्त करून घ्यावे लागेल. त्यापेक्षा चांगला उपाय सांगतो तो तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकतात.
त्यासाठी तुम्हाला आधार चा अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे. त्या नंतर वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला तिथे आधार अपडेट चे ऑप्शन दिसेल .
त्या नंतर तुम्हाला त्या वर क्लिक केल्यावर तुमचा समोर एक लिस्ट येईल त्या लिस्ट मध्ये तुम्हाला जाऊन Demogarphy अपडेट वर जाऊन क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्या नंतर तुम्हाला पुडचे पेज ओपन होईल त्या पेज वर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे .
तो टाकल्या नंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओ टि पी येईल . तो तुम्हाला तिथला captcha भरून सबमिट करायचा आहे.
ते केल्या नंतर तुम्हाला पुढचे पेज ओपन होईल त्या पेज वर तुम्हाला जन्म दिनांक ,लिंग , पत्ता बदलण्यासाठी ऑप्शन मिळेल ते काळजी पूर्वक वाचा करणार त्याला काही लिमिट आहे.
बदलण्यासाठी तुम्ही त्यात एकदा किंवा दोनदा बदला करू शकतात पण तुम्ही पत्ता पाहिजे तेवढ्या वेळेस बदलू शकतात.त्याला लिमिट नाही.
तर पुढे आपल्याला पत्ता बदलणे या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला त्या पेज वर खालचा बाजूला माहिती भरण्यासाठी जागा दिसेल पण तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा नाही आहे किंवा बदलू पण शकतात तुमचा गरजे अनुसार पण आपल्याला सध्या फकत आपला प्रश्न सोडवायचा आहे . त्यासाठी तुम्हाला तिथे जागा असेल Care Person Or Relative Person .
या ऑप्शन जाऊन त्या जागी तुम्हाला तुमचा केअर पर्सन चे नाव टाकायचे आहे . तुमचा वडिलांचे वगेरे जो कोणी असेल तो त्या नंतर तुमचा पत्ता बरोबर आहे का नाही चेक करून घ्याचा आहे .
आणि काही बदल करायचा असल्यास करून घ्यचा आहे . त्यानंतर आवश्यक कागद पत्र ची पुरतात करायची आहे. आणि ते अपलोड करून सबमिट करायचे आहे . ते केल्यानंतर तुम्हाला पुढचे पेज ओपन होईल तिथे तुम्हाला लागणारी फी सबमिट करायची आहे त्या साठी तुम्हाला फकत ५० रू इतका खरच येणार आहे. ती फी भरल्या नंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल पैसे भरल्याची आहे एक नंबर मिळेल.
त्या नंतर काही कालावधी नंतर तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट झालेला बघायला मिळेल. एकंदरीत तुमचा प्रोब्लेम सॉल्व झालेला असेल. हे झाले की नाही कसे कळणार त्या साठी तुम्हाला त्याच वेबसाईट वर अपडेट स्टेटस ऑप्शन बघायला मिळेल त्या वर जाऊन तुम्ही तुमचा आधार स्टेटस चेक करू शकतात. त्या नंतर तुम्ही ड्रायव्हिंग लायसेन्स साठी Apply करू शकतात.
अशा प्रकारे तुमचा प्रोब्लेम सोलव होईल. माहिती कशी वाटली नको कळवा काही प्रश्न असतील तर कमेंट करा नक्कीच त्याच उत्तर तुम्हाला दिले जाईल.
आवश्यक काही कागदपत्राची लिस्ट खाली देत आहे. त्या पैकी योग्य कागदपत्रे निवडून अपलोड करा.
पत्ता पुरावापासपोर्ट
बँक स्टेटमेंट/पासबुक
पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट/पासबुक
शिधापत्रिका
मतदार ओळखपत्र
चालक परवाना
PSU द्वारे जारी केलेले सरकारी फोटो ओळखपत्र/सेवा फोटो ओळखपत्र
वीज बिल (३ महिन्यांपेक्षा जुने नाही)
पाणी बिल (३ महिन्यांपेक्षा जुने नाही)
टेलिफोन लँडलाइन बिल (३ महिन्यांपेक्षा जुने नाही)
मालमत्ता कर पावती (1 वर्षापेक्षा जुनी नाही)
क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (3 महिन्यांपेक्षा जुने नाही)
विमा पॉलिसी.
जन्म पुरावा कागदपत्रे
जन्म प्रमाणपत्र
एसएसएलसी पुस्तक/ प्रमाणपत्र
पासपोर्ट
नावनोंदणी/अद्ययावत करण्यासाठी UIDAI मानक प्रमाणपत्र स्वरूपावर गट अ राजपत्रित अधिकाऱ्याने जारी केलेले जन्मतारखेचे प्रमाणपत्र
प्रमाणपत्र (नोंदणी/अद्ययावत करण्यासाठी UIDAI मानक प्रमाणपत्र स्वरूपावर) किंवा फोटो आणि जन्मतारीख असलेले आयडी कार्ड (DOB) सरकारी प्राधिकरणाद्वारे रीतसर स्वाक्षरी केलेले आणि जारी केलेले
मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेने जारी केलेले जन्मतारीख असलेले फोटो ओळखपत्र
पॅन कार्ड
कोणत्याही सरकारी मंडळाने किंवा विद्यापीठाने जारी केलेले मार्कशीट
DOB असलेले सरकारी फोटो आयडी कार्ड/ PSU द्वारे जारी केलेले फोटो ओळखपत्र
केंद्रीय/राज्य पेन्शन पेमेंट ऑर्डर
1 टिप्पण्या
son of care update kelel aahe aani photo pn chenge kela aahe tari pn same problem yet aahe please solution dya ....
उत्तर द्याहटवा